बीडशेड येथे उद्या शुक्रवारी गोकुळचा ‘ म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रम मेळावा ‘
करवीर :
गोकुळ दूध संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक दूध संस्थेचे चेअरमन, सचिव व निवडलेले दूध उत्पादक सभासद यांचा एकत्रित म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रम मेळावा बीडशेड (ता.करवीर ) येथील महालक्ष्मी मल्टिपर्पज हॉल येथे शुक्रवारी(दि. ८) दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच संघाचे कार्यकारी संचालक, सर्व विभाग प्रमुख, केडीसीसी बँकेचे अधिकारी, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. सदर मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन गोकुळ संघाचे संकलन व्यवस्थापक यांनी केले आहे.