पाऊस : राज्यात भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली
Tim Global :
राज्यात भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ४ ते ५ दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
या भागांना यलो अलर्ट जारी…
४ ऑक्टोबर , रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली,
५ ऑक्टोबर ,रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली,
६ ऑक्टोबर , रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा,
पुणे ७ ऑक्टोबर ,रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग.