गॅस : एलपीजी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ

दिल्ली :

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक लिक्विफाइड, पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ केली . आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक प्रति सिलेंडरची किंमत १७३६.५० रुपये इतकी झाली आहे.

हे नवीन दर आजपासून लागू होतील. व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ७५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
९ महिन्यांत ४०४.५० रुपयांची वाढ
नमूद केल्याप्रमाणे, गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती ७५ रुपयांनी वाढल्या होत्या.

ऑगस्टमध्येही किंमती दुप्पटीने वाढल्या होत्या. इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०२१ मध्ये आतापर्यंत एकूण ४०४.५० रुपयांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रति व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १३३२ रुपये इतकी होती. जी आता वाढ होऊन १७३६.५० रुपयांवर पोहोचली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!