वाचा : पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही यांबद्दल

Tim Global :

ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकताच जमा करण्यात आला आहे.

हेल्पालाईनद्वारे माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला 155261 किंवा टोल फ्री 1800115526 वर कॉल करता येईल. याशिवाय 011-23381052 वर कॉल करुनही माहिती मिळेल. pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवरही तक्रार करता येईल.

देशात एकूण 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 19 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत,मात्र अनेक शेतकरी आहेत ज्यांनी पीएम किसानसाठी  नोंदणी केली मात्र त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. असे शेतकरी त्यांच्या पीएम किसान योजनेच्या अर्जाचं स्टेटस पाहू शकतात ,आणि दुरुस्ती देखील करु शकतात.

हप्ता न मिळण्याची अनेक कारणे ….
पीएम किसान योजनेचा हप्ता न मिळण्याची अनेक कारणे आहेत. त्यात अर्ज करताना कागदपत्रांमधील त्रुटी किंवा खाते नंबरमधील चूक अशी कारणं असू शकतात. सध्या सर्व माहिती आधारशी लिंक असते. त्यामुळे आधारवरील तुमचं नाव आणि अर्जावरील तुमचं नाव सारखं असणं आवश्यक आहे. अर्जातील माहिती आणि आधारशी संलग्न माहिती मिळतीजुळती नसेल तर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता असते. म्हणूनच अर्ज करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

योजनेच्या अर्जाचं स्टेटस कसं तपासणार….
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलाय आणि तरीही तुम्हाला त्या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट दोन्हींच्या माध्यमातून मदत घेऊ शकता. वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in ला भेट द्यावी.

या ठिकाणी होमपेजवर उजव्या कोपऱ्यात फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) आहे. तेथे तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक माहिती टाकून तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळाले याचे तपशील मिळतील.

फार्मर्स कॉर्नर येथे त्रुटी असलेली माहिती दुरुस्त करण्याचाही पर्याय असतो. याचा उपयोग करुन तुम्ही तुमचा आधार क्रमांक किंवा इतर काही तपशील अपडेट करु शकता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!