UPSC परीक्षेचा निकाल जाहीर : महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६ वी
दिल्ली :
भारतीय पोलीस सेवा,
भारतीय प्रशासकीय सेवा,अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाणाऱ्या UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये शुभम कुमार देशात पहिला आला आहे. एकूण ७६१ उमेदवारांची यादी यूपीएससीकडून जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६ वी आली असून विनायक नरवदे देशात ३७ वा आला आहे.
महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६वी आली असून विनायक नरवदे देशात ३७वा आला आहे. ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.भोपाळच्या जागृती अवस्थीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीनं इंजिनिअरिंग केलं आहे.
परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २६३ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. ८६ उमेदवार मागासवर्गातील, २२९ ओबीसी, १२२ अनुसूचित जाती तर ६१ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. याशिवाय १५० उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. त्यामध्ये १५ आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील, ५५ ओबीसी, ५ अनुसूचित जाती तर एक उमेदवार अनुसूचित जमातीमधील आहे.
यूपीएससीची वेबसाईट upsc.gove.in वर हे निकाल पाहता येणार आहेत. नियमाप्रमाणे वेबसाईटवर आत्ता फक्त निकाल पाहता येणार असून सविस्तर गुणपत्र १५ दिवसांत संकेस्थळावरच अपलोड केलं जाईल.