एक हात कापला मात्र ‘दुसऱ्या हाताने जिंकले
जग’ : ऊर्जा देणारे यश
तुम्हाला जिंकायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर जाणून द्या यश म्हणजे काय असते
Tim Global :
प्रचंड इच्छाशक्तीला परिश्रमाची जोड दिल्यास सर्व काही शक्य असते, हे पॅरालिम्पिक पदार्पणात कांस्य पदक जिंकणारा भालाफेकपटू सुंदरसिंह गुर्जर याने दाखवून दिले आहे. एका घटनेत गुर्जर यांचा डावा हात कापावा लागला ,मात्र सुंदरसिंहने आशा सोडली नाही,बिकट स्थितीत सुंदरसिंह गुर्जर याने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक एफ ४६ श्रेणी खेळात चांगली कामगिरी करत कांस्य पदक जिंकले.सुंदरसिंहचे हे यश ऊर्जा देणारे आहे.
सुंदरसिंहने आयुष्यात कठीण परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. २०१५ पर्यंत सुंदर पूर्णपणे शारीरिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंमध्ये स्पर्धा करत होता.
सुंदरसिंह गुर्जर काही काळापूर्वी आत्महत्येचा विचारांशी झुंज देत होता. मात्र आता त्याला लोकांचे, विशेषत: त्याचे प्रशिक्षक महावीर सैनी यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी त्याला कठीण परिस्थितीत मदत केली.
हातावर पडले होते टनाचे छत…
सुंदरसिंहचे आयुष्य तेव्हा बदलले जेव्हा त्याच्या हातावर मित्राच्या घराचे टनाचे छत पडले आणि त्याचा डावा हात कापावा लागला होता. मात्र, सुंदरसिंहने आशा सोडली नाही आणि त्याच्या प्रशिक्षकाच्या मदतीने त्याने पॅरा प्लेयर प्रकारात पुनरागमन केले.
तो एका वर्षाच्या आत २०१६ रिओ पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरला होता. पण पुन्हा एकदा त्याला अडचणीचा सामना करावा लागला. सुंदरने वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी २०१६ च्या पॅरालिम्पिकसाठी पात्र झालो होतो पण त्यानंतर अपात्र झाल्याचे कळाले. तेव्हा सर्व काही संपले आहे, माझ्यासाठी काहीच शिल्लक नाही, असा विचार करून मी त्यावेळी तुटलो होतो.”
सुंदर रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी ५२ सेकंद उशिराने पोहचला होता, त्यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आले होते.
आत्महत्या करण्याचा विचार….
मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता पण त्यावेळी माझे प्रशिक्षक महावीर सैनी यांना समजले होते की माझ्या मनात काहीतरी चुकीचं सुरु आहे. काही महिने त्यांनी चौवीस तास माझ्यावर लक्ष ठेवले. मला एकटे सोडले नाही., असे सुंदरसिंहने सांगितले.
सुंदर म्हणाला की, “मी स्वत:मधील उणीवा दूर करून पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे ,आणि मला आशा आहे की २०२४ पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मी ही कामगिरी करू शकेल.”