अंदाज पावसाचा : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतही ६, ७ सप्टेंबरला काही भागांत जोरदार पाऊस
मुबई :
येत्या ४८ तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून
राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. . त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील ४ ते ५ दिवस कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा जास्त प्रभाव राहू शकतो.पश्चिाम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतही ६, ७ सप्टेंबरला काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
K S Hosalikar
@Hosalikar_KS
कमी दाबाचे क्षेत्र,येत्या ४८ तासात उत्तर/उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता. त्या मुळे येत्या 4,5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली आहे.
४,५ दिवशी कोकणात जास्त प्रभाव,मुंबई ठाणे पालघर. TC
कोकण विभाग वगळता इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण विभागात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकणासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी मुंबई, रत्नागिरी, अलीबाग, परभणी, चंद्रपूर या भागांत पावसाची नोंद झाली. कोकण विभागात ५ ते ६ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबरला काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत काही ठिकाणी ७ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६ आणि ७ सप्टेंबरला मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ आदी जिल्ह्यांतही काही भागांत ६, ७ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.