ज्ञानदेव वाकुरे
कोल्हापूर :
जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी, पूर व अवेळी पाऊस यामुळे शेतीपिके व फळपिकांचे एकुण 6 हजार 168.93 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
अंतिम अहवाल शासनास सादर केले आहेत.
जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी 48 हजार 42 शेतकऱ्यांना 581.20 लाख रूपये इतक्या रक्कमेचा निधी / मदतीचे वाटप महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.
2020 या वर्षातील नैसर्गिक आपत्तीसाठी प्राप्त निधीचे/ मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.