भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटला महिलेचा मृत्यू वेंगरूळ पूल वाहून गेला
भुदरगड :
भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव रात्री फुटला,यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून काही जनावरे वाहून गेली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे वेंगरूळ पूल वाहून गेला आहे .यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे . तलाव फुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तलाव बांधल्या नंतर पायातून गळती लागली होती. त्यामुळे तलाव दुरुस्तीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला होता.
मेघोली लघू पाटबंधारे तलाव २२ ते२३ जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. तलावात ९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.
मेघोली येथील हा लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फुटला. पाण्याच्या प्रवाहाने वेंगरूळ-ममदापूरदरम्यान ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे,तसेच नवले येथील सहा जनावरे वाहून गेली आहेत. दरम्यान, जिजाबाई धनाजी मोहिते वय ५५ रा. नवले यांचा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.तलाव फुटल्याने ओढ्या काठावरील शेतामध्ये पाणी घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.