थकीत मानधन त्वरित द्यावे अन्यथा आंदोलन
पुष्पा पाटील
करवीर :
राज्यभरात ७० हजार आशा आरोग्याची धुरा सांभाळत आहेत. मात्र तुटपुंज्या मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे, आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन मिळावे व मानधन वेळेवर मिळावे या मागणीसाठी तीन सप्टेंबरला दिल्ली येथे मीटिंग घेण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली येथे आंदोलन करण्याचा इशारा आशा गटप्रवर्तक यांनी दिला आहे, फुलेवाडी येथे आशा व गटप्रवर्तक यांचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी फेडरेशनच्या सहसचिव पुष्पा पाटील म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील युनिटी राज्याला आदर्श ठरत आहे. कोल्हापूरचे संघटन मोठ्या प्रमाणावर आहे ,यामुळे राज्यभरात संघटन वाढीला लागले आहे.
लालबावटा संघटनेचे सचिव शिवाजी मगदूम म्हणाले आशांनी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन मिळावे, मानधन वेळेवर मिळावे ,शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा मिळावा, अशी मागणी यावेळी केली. गेली पाच महिने मानधन दिलेले नाही ते मानधन त्वरित मिळावे, तसेच केंद्रीय पातळीवर मागण्या मांडण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मीटिंग घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले आशा एक परिपूर्ण आरोग्य सेवक म्हणून काम करत आहे.लसीकरण करण्याचे प्रशिक्षण आशांना देण्यात यावे असे मत मांडले.
आशा गटप्रवर्तक युनियन जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील म्हणाल्या आशांच्या एकजुटीच्या बळावर यश संपादन करत एक वर्षात वाढ पदरात पाडून घेतली आहे, पुढे किमान वेतन मिळेपर्यंत हा आंदोलनाचा लढा सुरूच राहणार आहे, कोरोना काळात आशांनी आरोग्याची धुरा सांभाळली मात्र शासनाकडून तुटपुंजे मानधन देऊन आशा स्वयंसेविका यांची चेष्टा केली जात आहे, शासनाने त्वरित थकित मानधन द्यावे अशी मागणी केली, यावेळी मनीषा पाटील ,सुप्रिया गुदले ,शुभांगी बेलेकर, ज्योती तावरे यांचे मनोगत झाले, ,सूत्रसंचालन संगीता पाटील, प्रास्ताविक वसुधा बोडके, आभार मनीषा पाटील यांनी मानले.
यावेळी करवीर तालुक्यातील आशा गतप्रवर्तक उपस्थित होत्या .