कोल्हापूर :
कोरोनाचे संकट यातच वाढीव वीज बिल यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे,अशा परिस्थितीत महावितरणने कोरोना,आणि लॉक डाउन कालावधीतील घरगुती वीज बिल माफ करावे अशी मागणी गेली तीन महिने होत आहे. शेतकऱ्यांना,व नागरिकांना घरगुती वीज बिलात सवलत मिळणार का ? वीज बिल भरावे का नको,अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.दरम्यान
जिल्ह्यात महावितरण ने तात्पुरत्या स्वरूपात ८३१ वीज कनेक्शन तोडली आहेत. अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
करवीर तालुक्यातील सांगरुळ, खूपिरे, पाडळी खुर्द, दोनवडे येथे व अनेक गावात वीज बिलांची होळी करण्यात आली होती.
आता महावितरण कंपनीकडून वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन तोडू असा इशारा दिला जात आहे.
कोरोना चा संसर्ग वाढत होता ,केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली होती. २२ मार्चपासून लॉक डाऊन केले होते. यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती,अशा वेळी शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत असताना वीज बिलात १५ टक्के वीज दर वाढ केली आहे, यामध्ये ३०० युनिटच्या आतील संपूर्ण वीज बिले माफ करावे अशी मागणी अशी मागणी सर्व पक्षीय संघटनानी केली होती.वीज दरात १०० युनिटपर्यंत ४६ पैसे,व त्यावरील ३०० युनिटपर्यंत ४१ पैसे वाढ केली आहे.राज्यभरात एक लाख ९७ हजार ग्राहक आहेत, यांना सुमारे सहाशे कोटी चा वाढीव बिलाचा भुर्दंड बसणार आहे.वीज बिल माफ करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत नागरिकांनी घरगुती वीज बिल भरू नये असे आवाहन एरिगेशन फेडरेशन यांनी केले होते. यामुळे नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही.आणि आता वीज बिल मोठ्या प्रमाणात थकले,असे असताना महावितरण कंपनीकडून वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जात आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी घरगुती वीज बिल न भरल्यामुळे प्रत्येकी सुमारे पाच ते सात हजाराच्या आसपास वीज बिले थकली आहेत.महावितरण कंपनीकडून वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट करू असा इशारा दिला जात आहे.अशा वेळी वीज बिल भरावे,का सवलत मिळणार अशा संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत.तसेच शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे ही नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे.
चंद्रकांत पाटील,
इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष
पाडळी खुर्द,
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल सवलत देऊ असे आश्वासन दिले होते.मात्र पूर्तता झालेली नाही, समाधानकारक लक्ष घातलेले नाही,आता महाविरणने दंडुकशाहीने वीज कनेक्शन कट करू नये,व शासन निर्णय झाले शिवाय वीज बिल वसूल करू नये, यासाठी फेडरेशनच्या वतीने सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.