खरी तारेवरची कसरत…

कोल्हापूर :

पालाच्या झोपड्या नव्हे….विजेचे पोल आहेत .
पंचगंगा भोगावती नदीला आलेल्या महापुरात विजेचे पोल आणि तारा उसाच्या पाल्याने भरून गेले आहेत . शिंदेवाडी ता. करवीर येथील विजेचे पोल तारा दुरुस्त करताना महावितरण च्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नदीकाठावरील व पूर क्षेत्रातील पोलवर उसाच्या पालाचा खच पडला आहे, पोलच्या तारांना झोपडपट्टीचे स्वरूप आले आहे . या शेती पंपाचा मेंटेनन्स करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कनिष्ठ अभियंता ऋषिकेश जोशिलकर, शुभम जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन निलेश पाटील ,विलास पाटील, सचिन खवले यांनी आज पर्यंत शेती पंपाच्या 13 पोलची स्वच्छता केली. आणखी सर्व पोल व तारांचे चे काम दुरुस्त करण्यासाठी एक आठवडा लागेल, यानंतर शेतीपंपाची वीज सुरू होईल, अशी माहिती यावेळी वायरमन विलास पाटील यांनी दिली, यावेळी शेतकरी बाबासो पाटील, जयदीप शिंदे, नितीन शिंदे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी ा महावितरणच्या कर्मचार्‍यांना सहकार्य केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!