करवीर तालुका भाजपच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव : तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील यांचा पुढाकार
करवीर :
भारतीय जनता पार्टीचे करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील
विविध गावात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करून त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तालुक्यातील हळदी, कुरुकली, कोथळी, कुर्डू, जैताळ, निगवे दुमाला, खाटांगळे, म्हाळुंगे, म्हiलसवडे, नंदवाळ, हणमंतवाडी, नागदेववाडी,बोलोली, भुयेवाडी, शिरोली दुमाला, हसुर दुमाला, भोगमवाडी, कोगे, सांगरुळ, आडूर इत्यादी गावात सरकारी व खाजगी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य सेवक, परिचारिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील,कृषी सेवक, मेडिकल दुकानदार, पशुवैद्यकीय डॉक्टर, पोलीस, माजी सैनिक, सामाजिक संस्था आदींचा भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चाफोडी येथील कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सरपंच पंढरीनाथ भोपळे होते. भाजपचे युवक पदाधिकारी अक्षय वरपे यांनी स्वागत तर निवास वरपे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच पंढरीनाथ भोपळे,
डॉ. मानसी पाटील, पोलीस पाटील गजानन पाटील आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविक निवास वरपे यांनी केले. स्वागत अक्षय वरपे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. ए.जी.राणे, साताप्पा सुर्वे, कृष्णात भोसले, पोलीस पाटील साताप्पा पाटील, सागर भोगम, सागर मोहिते
यांच्या सह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कोरोना योद्धे उपस्थित होते.