गोकुळ दूध संघास भारत पेट्रोलियम च्या पेट्रोल पंपास मंजूरी
कोल्हापूर: ता.१४
गोकुळ प्रकल्प येथे भारत पेट्रोलिय कारपोरिशन लि. या कंपनीचा पेट्रोल व डिझेल पंप मंजूर झालेला असून मंजूरीचे पत्र बी.पी.सी.एल.चे गोवा मॅनेजर अभिजीत पानारी यांनी संघाचे अध्यक्ष मा. श्री. विश्वास पाटील यांचेकडे आज संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये मंजूरीचे पत्र सुपूर्द केले.
यावेळी बोलताना चेअरमन श्री.विश्वास पाटील म्हाणाले कि गोकुळ दूध संघाची अनेक दिवसा पासून प्रलबीत असणारी पेट्रोल पंपाची मागणी पुर्णत्वास आली आहे. सदर पंपाची उभारणी गोकुळ शिरगाव एम.आय.डी. सी. येथेल संघाच्या जागेत हायवे कडील बाजूस करणेत येणार आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळणार असून यामुळे सदर पेट्रोल पंप ग्राहकांच्या पसंतीस पडेल, व या पंपाचा लाभ गोकुळ सलग्न दूध वाहतूक करणा-या सर्व वाहनाना तसेच संघाचे कर्मचारी व भागातील नागरीकांना यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. सदर पंपाच्या मंजूरीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेब व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या मंजूरी करीता संघाच्या सर्व संचालक मंडळाने व अधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत.
यावेळी चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे,संचालक अजित नरके, बाबासाहेब चौगले, बाळासो खाडे, बी.पी.सी.एल. चे गोवा मॅनेजर अभिजीत पानारी,अधिकारी संतोष साहणी, नानासाहेब सुगावकर, कार्यकारी संचालक डि.व्ही. घाणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील अदि उपस्थित होते.