सकारात्मक वृत्त

कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे १ लाख ३९
हजार डोस उपलब्ध

कोल्हापूर, दि. २६ (जिल्हा माहिती कार्यालय) :  कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे सुमारे १लाख ३९हजार डोस उपलब्ध झाले असून यातील १ हजार ३०० लस दिव्यांगांना तर १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सुमारे २४ हजार ६०० नागरिकांना पाहिल्या डोससाठी लस देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा – ४६४०, भुदरगड – ४८५० , चंदगड – ७५०० , गडहिंग्लज – ७९४०, गगनबावडा -९१०, हातकणंगले – २५५३०, कागल – ६२६०, करवीर – १३१७० , पन्हाळा -६१६०, राधानगरी – ६३५०, शाहूवाडी – ४८३०  तर  शिरोळ तालुक्यासाठी ६ हजार ६७० डोस प्राप्त झाले आहेत.
सीपीआर रूग्णालयासाठी १००० , सेवा रूग्णालय, (कसबा बावडा ) १००० तर कोल्हापूर महानगरपालिका १६ हजार २९० असे एकूण १ लाख १३ हजार १०० डोस प्राप्त झाले आहेत.
४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे. संबंधितांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!