गोकुळ मध्ये मतदार जनजागृती शिबीर संपन्न
कोल्हापूर ता.१३
कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाच्या गोकुळ शिरगाव येथे आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर ,जिल्हा निवडणूक आयोग तसेच तहसीलदार कार्यालय करवीर यांच्या सहकार्याने संघामार्फत मतदार जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी संघाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना आयोगाच्या प्रतिनिधीमार्फत नविन मतदार नोंदणी,बदल इत्यादी संदर्भात प्रशिक्षण देवून जनजागृती करणेत आली.
यावेळी चेअरमन मा.श्री. विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील,व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील तसेच इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.