प्लास्टिक बंदी : देशात १ जुलै २०२२ पासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी

दिल्ली :

Plastic ban…
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून जगावर प्लास्टिक प्रदूषणाचं संकट घोंगावत आहे. अनेकदा सरकारनं प्लास्टिक बंदीबाबत निर्णय घेतला. मात्र कठोर अंमलबजावणी झाली नाही. आता पर्यावरण मंत्रालयाने एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२२ पासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री तसेच वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ अधिसूचित केला आहे.

ट्विट
Ministry of Environment, Forest & Climate Change notifies Plastic Waste Management Amendment Rules, 2021, which prohibits identified single-use plastic items which have low utility and high littering potential by 2022

१ जुलै २०२२ पासून…..
पॉलिस्टीरिन आणि विस्तारीत पॉलिस्टीरिनसह एकेरी वापरातील प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असणार आहे. एकेरी वापराच्या प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,वझे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ध्वज, फुगा, आइसक्रिम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकॉल याचा समावेश आहे. प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप अशा वस्तूंचा समावेश आहे.

आता देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडींच्या पिशव्यांवर बंदी आहे.
प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी ३० सप्टेंबर २०२१ पासून ५० मायक्रॉनवरून ७५ मायक्रॉन करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२२ पासून ही जाडी १२० मायक्रॉन केली जाणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!