करवीर तालुक्यातील कोपार्डे येथून दहा लाखाच्या बनावट चलनी नोटा ताब्यात : परिसरात खळबळ : दोघे ताब्यात
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कोपार्डे सांगरुळ फाटा येथे इचलकरंजी पोलिसांनी सापळा रचून एका तरुणाला १० लाखाच्या बनावट चलनी नोटा, मुद्दे मालासह साहित्य ताब्यात घेतले आहे, या प्रकरणात करवीर तालुक्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.राजू लवंगे कळंबे तर्फ ठाणे, अंबाजी सुळेकर पासार्डे अशी त्यांची नावे आहेत . बनावट चलनी नोटा प्रकरणामुळे करवीर तालुक्यात सह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,
करवीर तालुक्याच्या पासार्डे
येथील अंबाजी सुळेकर यांने सांगरूळ फाटा कोपार्डे येथे सुमन शॉपी सुरू केली, या ठिकाणी झेरॉक्स, लॅमिनेशन, रबरी शिक्के तयार करण्याचे तो काम करत होता . याच व्यवसायातून तो पुढे अवैध काम करू लागला. या अवैध कामातून या तरुणाचे कर्नाटक मधील काही तरुणांशी संपर्क आला, आणि बनावट चलनी नोटा चे प्रकरण सुरू झाले.
कर्नाटक मधील या टोळीने या तरुणाला असली नोटांच्या बदली, बनावट चलनी नोटा देण्याचे डन केले होते. सुरुवातीला या करवीर तालुक्यातील तरुणाने हात उसने पैसे असे सुमारे चार लाख रुपये कर्नाटक मधील टोळीला दिले, बनावट चलनी नोटा त्या टोळीने दिल्या नाहीत, यावेळी त्या टोळीने बनावट पोलिस यंत्रणा उभी केली, आणि बनावट पोलीस पुढे करून या तरुणांकडून आणखी पैसे उकळले, टप्प्याटप्प्याने या तरुणाने सुमारे 27 लाख रुपये दिल्याची चर्चा आहे. कर्नाटक मधील टोळीला पैसे देऊन हा तरुण मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला होता.
आणि येथून सुरु झाला बनावट चलनी नोटांचा गैरकारभार….
करवीर तालुक्यातील हा तरुण रबरी शिक्के,आणि लॅमिनेशन करता करता प्रिंटर व साहित्य घेऊन बनव शैक्षणिक प्रमाणपत्र ही करू लागला.पुढे बनावट नोटा छापू लागला. यामध्ये राजमुद्रेचा शिक्का तयार करून प्रत्यक्षात या तरुणाने बनावट चलनी नोटा छापन्यास सुरुवात केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील एका बँकेत बनावट 9 चलनी नोटा सापडल्या, यानंतर इचलकरंजी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून या करवीर तालुक्यातील तरुणाचे धागे-दोरे पोलिसांना मिळाले, त्या नुसार करवीर तालुक्यातील या तरुणाचा तपास सुरू केला.
इचलकरंजी पोलिसांनी सांगरुळ फाटा कोपार्डे परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने गेली चार दिवस तपास केला, यावेळी या संशयित तरुणाकडे बनावट चलनी नोटा असल्याचे निदर्शनास आले.यानंतर या संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले, यामध्ये सुमारे दहा लाख 54 हजाराच्या बनावट चलनी नोटा,व बनावट शिक्के,11 लाखाचा मुद्दे माल सापडला, तसेच प्रिंटर व शिक्के, साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी या संशयित तरुणाला ताब्यात घेतले यावेळी घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान तपासाअंती आज पोलिसांकडून सर्व प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे.
कळंबे तर्फ ठाणे येथील राजू लवंगे पासार्डे येथीलअंबाजी सुळेकर यांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी बीबी महामुनी, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली .