करवीर तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय
काम बंद आंदोलन
करवीर :
आज करवीर तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय
काम बंद आंदोलन केले.करवीर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघ (आयटक संलग्न ) यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष कॉ. नामदेवराव गावडे.जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश पाटील,करवीर तालुका अध्यक्ष संतोष जाधव, करवीर तालुका सचिव शिवाजी पोवार उपस्थित होते.
गटविकास अधिकारी उगले यांनी मागण्यासाठी पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर निकालात काढू असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी विस्तार अधिकारी संदेश भोईटे उपस्थित होते.
प्रलंबित मागण्या मध्ये 10 ऑगस्ट 2020 रोजी उधोग ऊर्जा व कामगार विभागाने काढलेल्या राज्य पत्राप्रमाणे किमान वेतनानुसार परिपत्रक काढावे.सुधारित राहणीमान भत्ता लागू करावा.ग्रामपंचायत कर्मचारी यांचा विमा ग्रामपंचायत मार्फत सुरु करावा. 35 % रक्कम कर्मचारी यांच्या पगारापोटी शिल्लक ठेवावी,
जल सुरक्षा रक्षक मानधन खात्यावर जमा करणे ,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रमाणे रजा व सुट्या मिळाव्यात या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी विशाल कांबळे, शिवाजी पाटील,सुभाष पाटील,अमित नलगे, सर्जेराव सासणे,निलेश बरगे,अजित पाटील,सुभाष मोरे,जयवंत पाटील, संदीप कुंभार,संभाजी आंबी , सरदार पाटील,रंगराव कदम, संदीप चव्हाण,उदय शिंदे,बंडोपंत जासूद उपस्थित होते.