राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले
राधानगरी :
राधानगरी आणि धरण कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे, यामुळे धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत.

चार स्वयंचलित दरवाज्यातून ५७१२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे, वीजनिर्मितीसाठी १४४० विसर्ग सुरु आहे. दरम्यान भोगावती नदी मध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असून पाणी पातळीत वाढ झाली आहे.