समरजितसिंह घाटगे यांची आरे, हळदी गावाला भेटी : हळदी येथे व्यापाऱ्यांशी चर्चा
करवीर :
करवीर तालुक्यातील आरे , हळदी येथे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आरे व हळदी गावचा पाहणी दौरा केला. आरे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन घाटगे यांना देण्यात आले. तसेच हळदी येथे व्यापारी, दुकानदार यांच्याशी त्यांनी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या. यावेळी भगवान काटे, करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित हळदी येथील पत्रकार परिषदेत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, भाजप सरकारने २०१९ ला ज्याप्रमाणे पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे तातडीने अनुदान
देऊन मदत केली होती. त्या धर्तीवर राज्यातील सरकारने तातडीने अनुदान द्यावे. अजून सरकारने पॅकेज जाहीर केलेले नाही. सरकार पूरग्रस्तांना मदत करण्यात कमी पडत असल्याची टीकाही केली.
पंचनाम्याची कामे संथगतीने सुरू आहेत. व्यापारी, दुकानदारांचे पुराने नुकसान झाले आहे, त्यामुळे त्यांचे पंचनामे करताना निकषांच्या अटीत अडकवू नये. शेतकरी, व्यापारी, दुकानदार यांच्या पाठीशी भाजप राहणार आहे. महापूर उपाययोजना म्हणून भिंतीची गरज नसून नद्याजोड प्रकल्प सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगितले.
यावेळी आरे येथे निवासराव मोहिते, उपसरपंच एकनाथ गुरव, बाजीराव वरुटे, शैलेश पाटील तसेच हळदी येथे सरपंच विमलताई पाटील, उपसरपंच बाजीराव पाटील यांच्यासह भाजपचे भोगावती कारखान्याचे संचालक दत्तात्रय मेडसिंगे, नामदेवराव पाटील, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.आनंद गुरव, बी.वाय.लांबोरे, दिलीप देशमुख , भगवान कुंभार, आदिंसह ग्रामस्थ , दुकानदार उपस्थित होते.