सर्वे पूर्ण : या गावात तातडीने पूरग्रस्तांचा सर्वे पूर्ण : धान्य ही केले वाटप
करवीर :
भोगावती नदीला आलेल्या महापुरामुळे साबळेवाडी ता. करवीर येथे सुमारे ६५ कुटुंबांना
पुराचा फटका बसला, शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने सानुग्रह निर्वाह भत्ता अनुदान देण्यासाठी तातडीने सर्वे करण्यात आला. यावेळी ५० कुटुंबाचा सर्वे झाला असून पूरग्रस्तांना धान्य वाटप करण्यात आले अशी माहिती सरपंच ज्योती आंबी, उपसरपंच नामदेव पाटील यांनी दिली.
यावेळी सरपंच आंबी, म्हणाल्या ५० कुटुंबाचा सर्वे झाला , पंधरा कुटुंब स्थलांतर झाली होती, पूरग्रस्तांना धान्य वाटप करण्यात आले, आणि पडझडीचे पंचनामे ही पूर्ण करण्यात आले आहेत. उपसरपंच नामदेव पाटील म्हणाले पूरकाळात राम पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात आला असून गावांमध्ये पूर ओसरल्यानंतर मेडिक्लोर घरोघरी देऊन औषध फवारणी करण्यात आली आहे .
यावेळी सदस्य कृष्णात धुंदरे, सरदार पाटील, अनिता पाटील ,निशिगंधा पाटील,शीतल धुंदरे, तानाजी पाटील ,सुरेश पाटील, मोहन गडकरी, तंटामुक्त अध्यक्ष उत्तम पाटील, तलाठी नवेली बेळणेकर, पोलीस पाटील सविता गुरव, कोतवाल शिवाजी गुरव, शाखा अभियंता विखे पाटील ,ग्रामसेवक अभिजीत चौगुले सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.