पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर एक फूट पुराचे पाणी
करवीर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर रात्री 11 वाजता एक फूट पुराचे पाणी आले आहे.रात्री उशिरा पर्यंत याच पाण्यातून वाहने ये जा करत आहेत.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीचे
पुराचे पाणी रात्री रस्त्यावर आले,आज सकाळी रस्त्या खाली सुमारे 12 फूट खाली पाणी होते,
जोरदार पाऊस पडल्याने तासाला किमान 1 फुटाणे उभे पाणी वाढत राहिले,आणि आता 11 वाजता रस्त्यावर सुमारे 1 फूट पाणी आले आहे.पाण्याची वाढ अशीच राहिल्यास सकाळी रस्त्यावर सुमारे सहा ते सात फूट पाणी येईल अशी परिस्थिती आहे.