ब्रेकिंग : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे रस्त्यावर पुराचे पाणी
गगनबावडा :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली ता, गगनबावडा येथे रस्त्यावर रात्री साडे नऊ च्या सुमारास पुराचे पाणी आले. यामुळे रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे . अशी माहिती मांडुकली पोलीस पाटील हंबीरराव पडवळ यांनी दिली .

तसेच परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे,
कुंभी धरणातून मोट्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, गगनबावडा ते कोल्हापूर मार्गावर मांडुकली येथे रस्त्यावर रात्री साडे नऊ च्या सुमारास पुराचे पाणी आले याठिकाणी तहसीलदार, व पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली व पहाणी केली.