युवक काँग्रेसची बीडशेड येथे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम
करवीर :
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीच्या विरोधात “राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम” राबविण्यात येत असून, या अनुषंगाने आज कसबा बीड (ता. करवीर) येथे आमदार पी. एन. पाटील (साहेब), सत्यजित तांबे , युवा नेते राजेश पाटील, जि. प. अध्यक्ष राहुल पाटील, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सुमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी कसबा बीडचे नेते शामराव सुर्यवंशी, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश कांबळे , डॉ. लखन भोगम, स्वरुप पाटील, इंद्रजीत पाटील, ऋतुराज संकपाळ, सचिन पाटील, युवराज पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, किरण नलवडे, अपुल पाटील , प्रदीप भोगम, विक्रम पाटील, संकेत भोगम, सौरभ भोगम, ओंकार पाटील, धोंडीराम जाधव यांच्यासह करवीर तालुक्यांतील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.