दूध खरेदी दरवाढ निर्णयाबद्दल दूध संस्थाच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष व संचालकांचा सत्कार
कोल्हापूर:
गोकुळ दूध संघाने म्हैशीच्या दूधाला २ रूपये व गायीच्या दूधाला १ रुपये खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांच्या भावनेचा आदर केल्याबद्दल संघाच्या गोकुळ प्रकल्प,गोकुळ शिरगाव येथे गोकुळ शी सलग्न प्राथमिक दूध संस्थामार्फत चेअरमन विश्वास नारायण पाटील यांचा व संचालक मंडळाचा सत्कार श्री.महादेव सहकारी दूध व्याव.संस्था चांदे, श्री.दत्त सहकारी दूध व्याव. संस्था वाकरे, कै. शिवाजी सिताराम पाटील सहकारी दूध व्याव. संस्था आमशी, कै.राऊ पाटील सहकारी दूध व्याव. संस्था हसुर दु., श्री.दत्त सहकारी दूध व्याव संस्था रेंदाळ, श्री.कृष्णशक्ती सहकारी दूध संस्था सेनिक टाकळी, अनंत कुलकर्णी सहकारी दूध व्याव. संस्था अब्दुलाट, श्री.कामधेनु सहकारी दूध व्याव. संस्था हलसवडे, शहिद जवान सहकारी दूध व्याव.संस्था सावर्डे, श्री. भैरवनाथ सहकारी दूध व्याव. संस्था रागोळी, यशोधन सहकारी दूध व्याव.संस्था मौजे सांगाव, श्री.महालक्ष्मी महिला सहकारी दूध व्याव.संस्था बहिरेश्वर, कै.नानूबाई चौगले सहकारी दूध व्याव.संस्था माजगाव या संस्थेमार्फत करण्यात आला.
यावेळी सत्कारास उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य दूध उत्पादक सभासदांचा दूध संघ असून गोर- गरीबांचा प्रमुख आधार म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. लाखो दूध उत्पादकांचा विश्वास संपादन करणारा व प्रत्येक दहा दिवसाला दूध उत्पादकांच्या हातात दूध बिल देणारा दूध संघ म्हणून गोकुळची ख्याती आहे. तसेच कामकाज व व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्रात क्रमांक १ चा संघ आहे. गोकुळमध्ये गुणवत्ता जोपासत असताना दूध उत्पादक ,प्रथमिक दूध संस्था, वितरक व ग्राहकांच्या हिताला महत्व दिलेले आहे. गोकुळ परिवारातील सर्व घटकाचे हित जोपासून सर्वसमावेशक कामकाज करू असे मनोगत व्यक्त केले.
जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्यवस्था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून वेगळा ठसा उमटवला व गोकुळच्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाच्या खरेदी दरात वाढ करून आधार दिला.गोकुळने जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांचे संसार उभे करण्याचे काम चांगल्या प्रकारे केले आहे. या विश्वासावर दूध उत्पादकांनी आपल्या प्रापंचिक गरजा पूर्ण करण्यासाठी दुग्धव्यवसायाचा आधार गोकुळच्या माध्यमातून घेतलेला आहे. कोल्हापूर जिल्हा समृध्द होण्यासाठी गोकुळ संस्था कारणीभूत आहे. गोकुळची गुणवत्ता, कार्यक्षमता व स्वच्छता या बाबी वाखाणण्यसारख्या आहेत. गोकुळ सारखा शिखर संस्थेचा आम्ही एक घटक आहे यांचा आम्हाला सारत अभिामान आहे.असे उद्गगार दूध संस्था प्रतिनिधीनी काढले.
चेअरमन मा.श्री.विश्वासराव नारायण पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे,अजित नरके,नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील दूध संस्थाचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.