जिल्ह्यात ४९२ हेक्टर क्षेत्र अद्याप पेरणी विना
कोल्हापूर :
जिल्ह्यात सूर्यफूल हंगामाचा अंतिम टप्पा आला आहे.या हंगामातील सूर्यफूल पेरणीसाठी फक्त दहा दिवस उरले असताना जिल्ह्यात सूर्यफुलाच्या बियानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळी शेतकरी बियाणे उपलब्ध करण्यासाठी धावाधाव करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अद्याप ४९२ हेक्टर क्षेत्र पेरणी विना राहिले आहे.कृषी खात्याने तातडीने लक्ष देऊन बियाणे उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात यंदा रब्बीचे सुर्यफुलाचे ९७२ हेक्टर क्षेत्राचा कृषी विभागा चा अंदाज होता. त्यापैकी पन्नास टक्के म्हणजे ४८० हेक्टर वर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात गेली चार वर्षे बोगस बियाणाचा सुळसुळाट होता. बोगस बियाण्यामुळे राधानगरी,शाहूवाडी पन्हाळा येथील शेतकऱ्यांनी सूर्य फुलाकडे पाठ फिरवली होती. यंदा जिल्यात उसाचे क्षेत्र काही प्रमाणात काढून शेतकऱ्यांनी सूर्यफूल पीक घेण्यावर भर दिला आहे.परंतु सुमारे ५० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सूर्यफूल पेरणी साठी डिसेंबर ते १५ फेब्रुवारी हा साधारण कालावधी आहे. यानंतर पेरणी झाल्यास जूनच्या पावसात सूर्य फुलांची काढणी करावी लागेल, नुकसान होईल, यामुळे शेतकरी १५ फेब्रुवारीच्या आत पेरणी करण्यासाठी धडपडत आहेत.
सर्वत्र ऊस तोडण्याची लगबग सुरू आहे, खोडवा ऊस काढून शेतकरी सूर्यफूल घेण्यावर भर देत आहे. मात्र बियाणे उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
अद्याप जिल्ह्यात ४९२ हेक्टर क्षेत्र सूर्यफुलाचे पेरणी विना प्रलंबित आहे.अशा वेळी काही शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातून बियाणे उपलब्ध होत नाही.म्हणून सांगली जिल्ह्यात जाऊन बियाणे घेऊन येत आहेत.कोगे येथील शिवाजी लहू मोरे यांचेशी संपर्क साधला असता,यंदा अडीच एकर सूर्य फुल करण्यात येणार होते,बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध झालेने निम्मे क्षेत्र फुलाचे केले आहे.
कृष्णात पाटील, शेतकरी वाकरे
यंदा दोन एकर सूर्य फुलांसाठी क्षेत्र काढले, बियाणे लवकर उपलब्ध झाले नाही, एक एकर पेरणी केली,एक एकर साठी बियाणे मिळाले नाही.
ज्ञानेश्वर वाकुरे , जिल्हा कृषी अधीक्षक,
जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी साडेपाच टन बियाणे आले होते.क्षेत्र व मागणी वाढल्याने बियानाचा तुटवटा झाला.
शेतकऱ्यांना बियाणे पाहिजे असल्यास ज्या त्या तालुक्यात कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी कार्यालय येथे संपर्क साधावा बियाणे उपलब्ध करुन देऊ.