सकारात्मक : कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 80 हजार 750 डोस उपलब्ध

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे 80 हजार 750 डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यापैकी 2 हजार 800 लस या दिव्यांग आणि परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा -3 हजार, भुदरगड -3 हजार 330, चंदगड – 4 हजार 690, गडहिंग्लज-5 हजार 870, गगनबावडा -780, हातकणंगले – 15 हजार 840, कागल – 4 हजार 480, करवीर- 8 हजार 410, पन्हाळा – 4 हजार 500, राधानगरी – 4 हजार 790, शाहूवाडी – 4 हजार 190 तर शिरोळ तालुक्यासाठी 7 हजार 220 डोस प्राप्त झाले आहेत.

सीपीआर रूग्णालयासाठी 550, सेवा रूग्णालय, कसबा बावडासाठी 800 तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 9 हजार 500 असे एकूण 77 हजार 950 डोस प्राप्त झाले आहेत. 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!