बीडशेड येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त मास्क, सॅनिटायझर व रोप वाटप
करवीर :
बीडशेड (ता.करवीर) येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या सहाव्या वर्धापननिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत युवा व्यावसायिक विजय गावडे व त्यांच्या कुटुंबी यांच्या वतीने मास्क, सॅनिटायझर वाटप व वृक्षांचे रोप वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे यांनी विजय गावडे यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच यापुढेही व्यवसायवाढीसह ही सामाजिक बांधिलकीही वृद्धिंगत होत राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यापक कृष्णात गावडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणात समाजऋण जोपासण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून बेकरी व्यावसायास ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले व यापुढेही अशीच साथ देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कुंभी कारखान्याचे संचालक उत्तमराव वरुटे, मार्केट कमिटीचे माजी व्हा.चेअरमन शामराव सूर्यवंशी, सरपंच सर्जेराव तिबिले, पांडुरंग विकास संस्थेचे चेअरमन अमित वरुटे, प्रताप पाटील, कॉ. दिनकर सूर्यवंशी, प्रकाश तिबिले, मुकुंद पाटील, संदीप सुतार, चंद्रकांत गायकवाड, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशीलदार, निवृत्ती गावडे, राजाराम गावडे, भगवान तिबिले, गावडे कुटुंबीय आदी उपस्थित होते.