साखरेला ३६ रुपये हमी भाव मिळावा
: अध्यक्ष चंद्रदिप नरके
करवीर :
साखरेला उत्पादन खर्चा वर आधारित ३६ रुपये हमी भाव मिळावा व निर्यातीसाठी केंद्रसरकारकडून मिळणारे पुर्वी प्रमाणेच प्रतिटन १ हजार २४ रुपये निर्यात अनुदान कायम ठेवून ते वेळेत साखर निर्यातदार कारखान्यांना मिळावे अशी मागणी कुंभी कासारी कारखान्याचे अध्यक्ष माजी आम. चंद्रदिप नरके यांनी केली.
कारखान्याच्या मिलरोलर पुजन कार्यक्रमात अध्यक्ष नरके बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले. हंगाम २०१९/२० मध्ये गाळप झालेल्या ऊसाची उच्चांकी एक रक्कमी एफआरपी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.अतिरिक्त साखर उत्पादन व हमी भावाप्रमाणे साखरेला दर मिळत नसल्याने प्रत्येक हंगामात राज्यातील साखर उद्योगापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होत आहे. केंद्र शासनाने साखरेला प्रती किलो ३६ रुपये हमी भाव द्यावा साखर निर्यात कोठा वाढवावा व पुर्वी प्रमाणे निर्यात अनुदान कायम ठेवावे अशी मागणी चंद्रदिप नरके यांनी केली.
यावेळी संचालक अँड. बाजीराव शेलार, संजय पाटील, विलास पाटील,प्रकाश पाटील (कोगे)किशोर पाटील, उत्तमराव वरूटे,जयसिंग पाटील, दादासो लाड, प्रकाश पाटील(पाटपन्हाळा),माधुरी पाटील, मयुरी पाटील, भगवान पाटील आनंदराव पाटील, दिलिप गोसावी कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते.