इंधन दर वाढीचा फटका : एक वर्षात डिझेलमध्ये लिटरला ३० रुपये दरवाढ

कोल्हापूर :

इंधन दर वाढीमुळे शेतीचे गणित बिघडले आहे .मे महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल पंधरा वेळा , एका महिन्यात चार रुपये १७ पैसे लिटरला दर वाढ झाली आहे . गेल्या वर्षी सन २०२० मे मध्ये डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपये ५१ पैसे होता, आता जून २०२१ मध्ये डिझेल दर ९५.५० पैसे आहे. म्हणजे एका वर्षात प्रतिलिटर ३० रुपये डिझेल दरवाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चात तीस ते पस्तीस टक्के वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीचा फटका थेट शेतकऱ्याला,आणि ट्रॅक्टर मालक यांना बसला आहे.यामुळे खर्चावर आधारित उसाचे,इतर पिकाचे दर वाढावे अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात यांत्रिकीकरणाला गती आली आहे.
गेल्या दहा वर्षात ट्रॅक्टरने शेतीची कामे करण्यास वेग आला असून आधुनिकीकरणाचा वापर शेतकरी करत आहेत. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सुमारे 48 हजार ट्रॅक्टरची संख्या आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विशेष करून रब्बी आणि खरीप अशी दोन पिके वर्षाच्या कालावधी मध्ये घेतली जातात.
वर्षभरात शेतकऱ्याला दोन पिकासाठी किमान चार वेळा ट्रॅक्टरने शेतीची मशागत करावी लागते. यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनांचा वापर केला जातो, यंत्रामुळे शेतकर्‍यांच्या वेळेच्या बचती सह परिश्रम वाचले आहेत ,ामुळे ट्रॅक्‍टरच्या संख्येत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार मशागतीचे दर वेगवेगळे आहेत . गेल्या वर्षभरात इंधनाचे दर वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा मेळ बसत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे २०२० मध्ये डिझेल दर प्रति लिटर ६५ रुपये ५१ पैसे होता . आता जून २०२१ अखेर डिझेलचा दर प्रति लिटर ९५ रुपये ५० पैसे झाला आहे. एका वर्षात ३० रुपये प्रति लिटर दर वाढला आहे.

यामुळे गेल्या वर्षी नांगरट व मशागतीचा एकरी खर्च सुमारे आठ ते नऊ हजार होता, डिझेल दर वाढल्यामुळे नांगरटी , मशागतीचा खर्च वाढून प्रति एकर १२ ते १३ हजार रुपये दर झाला आहे. इंधन दर वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे, यामुळे ट्रॅक्टर मालक ही आर्थिक अडचणीत आला आहे.

===================

शिवाजी मोरे, कोगे शेतकरी,
कोरोना लॉकडाऊन यातच
यंदा खत दरात प्रति पोते सातशे रुपये दरवाढ झाली आहे.मशागतीचा खर्च एकरी ३५ टक्क्यांनी वाढला,औषधे, बियाणे ,खते,पाणीपट्टी सर्व घटकाची दरवाढ झाल्यामुळे शेतीचा मेळ बसत नसल्याचे चित्र आहे.

===============
ट्रॅक्टर मशागतीचे दर प्रति एकर,
नांगरणी,
सन २०२० = ३६०० ,
२०२१ = ४०००,
रोटर मारणे,
२०२० = २८००,
२०२१ = ३६००,
सरी पाडणे,
२०२० = २०००,
२०२१ = २४००,
ऊस भरणी,
२०२० = ४८००,
२०२१ = ५२००.

====================
शहाजी शिंदे शेतकरी दोनवडे,
इंधन दर वाढ, खते बी-बियाणे कीटकनाशके दर वाढ झाल्यामुळे, एकरी खर्चात सुमारे 30 टक्के वाढ झाली आहे, उत्पादन खर्चावर आधारित किंवा उसाच्या व इतर पिकाच्या दरामध्ये तीस टक्के दरवाढ व्हावी.
शेतकऱ्याचे जगणे मुश्कील झाले आहे.

=====================
युवराज कांबळे, ट्रॅक्टर मालक,
डिझेल दरवाढ झाल्यामुळे ट्रॅक्टर मालकाला मशागत व्यवसाय परवडत नाही. ड्रायव्हर पगार, झीज, कर्जाचे व्याज ,यातच डिझेल दरवाढ, यामुळे खर्चाचा मेळ बसत नाही, वर्षभर नांगरट करून ही, हातात काहीच पैसे शिल्लक राहत नाहीत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!