बारावीचा निकाल : असे होणार मूल्यमापन शासन निर्णय जाहीर
मुंबई :
राज्यातील कोरोनाने स्थिती बिकट झाली,यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना भविष्याची चिंता निर्माण झाली वहोती. बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात जाण्यासाठी गुण कसे दिले जाणार, याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती. आणि मूल्यमापन कसे होणार?, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, निकालाच्या मूल्यमापनाबाबत शासनाने निर्णय जाहीर केला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना मुल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे, असे शासनाने जाहीर केले आहे.
निकालासाठी मूल्यमापन….
२०१९ मधील विषयनिहाय लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिकाचे अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारीत करण्यात आले आहे. यात मिळाले गुण कायम ठेवण्यात येतील, असे शासनाने म्हटले आहे. शासनाने यासाठी ३०:३०:४० असा फॉर्म्युला ठरवला आहे.
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेतील गुण, अकरावीच्या अंतिम परीक्षेतील गुण तसेच बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील गुण यानुसार ठरवले जातील. परीक्षेसाठी निर्धारीत एकूण गुणांपैकी ३० टक्के गुण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील, ३० टक्के गुण अकरावीच्या परिक्षेतील, तसेच ४० टक्के गुण बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील असतील.