संकट काळात रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य : विश्वास पाटील ( शिरोली दुमाला येथे शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर)
करवीर :
तुळशी सहकार समूहाच्या माध्यमातून कै.शिवाजीराव पाटील यांचा गावच्या सर्व कार्यात विशेष सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात त्यांच्या सरदार पाटील कुटुंबीयांनी सामाजिक कार्याचा वारसा कायम जोपासला आहे. कोरोनाच्या संकट काळात रक्तदानाचा हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले.
शिरोली दुमाला (ता.करवीर) येथील तुळशी सहकार समूहाचे संस्थापक नेते शिवाजीराव कृष्णा पाटील यांच्या १२ स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ९५ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदान शिबिराचे हे सलग १२ वे वर्ष असून तुळशी सहकार समूहाचे युवा नेते माजी उपसरपंच सरदार पाटील व पै. नितीन पाटील यांनी रक्तदानाची सामाजिक चळवळ कायम ठेवली आहे.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील आबाजी म्हणाले,
कै.शिवाजीराव पाटील यांचा गावच्या सर्व कार्यात अग्रेसर असायचे. तुळशी सहकार समूहाच्या माध्यमातून त्यांनी सहकार वाढवला. पाटील कुटूंबीयांनी कोरोनाच्या संकट काळात रक्तदानाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकस्पद आहे.
माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, सरदार पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी रक्तदान शिबिराच्या उपक्रमात सलग १२ वर्ष सातत्य ठेवले आहे. सध्या रक्तदानाची मोठी गरज आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला आमचे कायम सहकार्य राहील.
सुरुवातीला तुळशी सहकार समूहाचे नेते सरदार पाटील यांनी स्वागत केले. या शिबिरास कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, वीरशैव बँकेचे चेअरमन अनिल सोलापुरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सचिन पाटील, एस.के.पाटील, ग्रा.पं.सदस्य सरदार पाटील, एकनाथ भोपळे, मच्छिद्र कांबळे, ग्रामसेवक बी.एस. कांबळे, अर्पण ब्लड बॅंकेचे कर्मचारी, तुळशी सहकार समूहाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी उपस्थिती लावली. पै.नितीन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.