शंभर टक्के कोरोना मुक्त गाव
करवीर :
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची महामारी सुरू आहे. ग्रामीण भागातील कोरोना पसरला असून अनेक गावे बाधित झाली आहेत,मात्र कोल्हापुर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर वर असणाऱ्या निटवडे गावाने कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखल्याने आज ही निटवडे गाव 100% कोरोना मुक्त आहे.

निटवडे हे गाव करवीर तालुक्यातील शेवटचे गाव आहे. गावची लोकसंख्या जरी एक हजार च्या आसपास असली तरी गावातील अनेक लोकांचे संपर्क कामानिमित्त व नोकरी बाबत कोल्हापूर शहराशी येतो .गावाच्या शेजारी असणारे गावे वरणगे पाडळी, यवलुज या गावात कोरोना संसर्गजन्य वाढला आहे . जवळ असलेले निटवडे गावातील नागरिकांना या गावाशी आर्थिक व्यवहार,बाजार करणे करता सतत संपर्क ठेवावा लागत असतो .तरी ही गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घेवुन कोरोनाला गावामध्ये प्रवेश करु दिलेला नाही.
ग्रामपंचायतीच्या सुचनेनुसार गावात दुध संस्था, सेवा संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स पालत, मास्क वापरणे , तसेच सॅनिटायझर याचा सतत वापर करण्यात येतो.तसेच संरपच उपसंरपच मंगल पाटील , सर्व सदस्य ,ग्रामसेवक सेरेखा जांबिलकर डॉ.मोहन जांभळे ,दक्षता समिती,पोलीस पाटील सविता पाटील ,आशावर्कर्स सुरेखा व्हरंबळे , अंगणवाडी सेविका,मदतनीस.ग्रामपंचायत कर्मचारी यानी केलेली जनजागृती आणी सर्वांच्या आव्हानाला ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिसादामुळे गावांमध्ये अद्याप एक ही रुग्ण सापडलेला नाही. कामावर जाणारे तरुण व गावातील ग्रामस्थ जास्तीत जास्त सोशल डिस्टन,व नियम पाळताना दिसतात. यामुळे इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा असे चित्र आहे .
तुकाराम व्हराबळे,निटवडे सरपंच…ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधक नियमावली चे पालन करून सहकार्य केल्याने निटवडे गाव कोरोना मुक्त आहे.गावातील साठ वर्षांवरील नागरिकाचे लसीकरण पुर्ण करणेत आले आहे.