वीरशैव लिंगायत समाजातर्फे ‘गोकुळ’चे चेअरमन विश्वासराव पाटील यांचा सत्कार
कोल्हापूर :१२
प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलन करणे हे आमचे ध्येय असून हे ध्येय निश्चित होण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून हे ध्येय उत्पादक शेतकर्यांच्या सहकार्याने गाठणार आहोत असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केला.
वीरशैव लिंगायत समाज, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाज, विविध संस्था, व्यक्तींच्या वतीने आयोजित सत्कारा प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे हे होते. गाताडे म्हणाले, दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून गोकुळने शेतकर्यांना दूधासाठी जादा दर दिला आहे व गोकुळचे काम कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा तर ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांचा सत्कार समाजाचे सचिव राजू वाली यांच्या हस्ते झाला. यावेळी वीरशैव को.ऑप बॅंकेचे अध्यक्ष अनिल सोलापूरे, समाजाचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, राजेश पाटील चंदूरकर, चंद्रकांत स्वामी, चार्टर्ड अकौंटंट एस.एस.नागावकर, उदय पाटील, बी.एस.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.