नागरिक,वाहतूकदारातून समाधान
कोल्हापूर :
शिंगणापूर ता.करवीर येथील
रस्ता अनेक दिवसापासुन रखडला होता. अखेर कामाला सुरूवात होवुन काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे.यामुळे नागरिक,वाहतूकदारातून समाधान व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्ष चिखली शिंगणापूर रखडलेला रस्ता अखेर पूर्णत्वाकडे येत आहे. ९० टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले असून येत्या आठवड्याभरात रस्ता सुरू होणार आहे. अशी माहिती संबंधित यंत्रणेने दिली आहे.
या कामास भाजप शिवसेना सरकार असतना मंजुरी मिळाली होती,कामास सुरूवात पण झाली होती, पण काही शेतकऱ्यांनी शेतीची नुकसान भरपाई मिळत नाही यासाठी काम बंद पाडले होते. यामुळे हे काम गेल्या एक वर्षापासून बंद होते.
काम का बंद याची माहिती घेवून आ.पी. एन. पाटील यानी संबधित शेतकरी याना फोन वरुन तुमची नुकसान भरपाई देण्याकिरता पाठपुरावा करण्यात येईल, आपण कामात कोणता च अडथळा आणु नये असे विनंती केली, आणी काम तात्काळ पुर्ण करणेत यावे असे बांधकाम विभागास सूचना देवून कामास सुरूवात करण्यात आली होती. गेले एक महिना सातत्याने काम सुरू आहे.
या मार्गाचा वापर शहरातून न जाता बायपास रत्त्नागिरी कोकणात तसेच निगवे मार्गी पुणे मुंबई हवेला जाऊ शकतो, तसेच पन्हाळा ,शाहूवाडी करवीर ,गगनबावडा या मार्गासाठी साठी हा रस्ता उपयुक्त आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक ही केली जाते.
काॅन्ट्रक्टर विनोद खोद्रे, गिरीष पाटील यांच्याकडे कामाची नियोजन आहे , त्यांनी सांगितले दुरुस्ती चे काम युध्दपातळीवर करणेत येत आहे पावसाळ्याचे आधी पुर्ण होईल,
सदरचा रस्ता पुर्ण होण्यास काही कालावधी लागणर असल्याने या रस्तावरील वाहतूक पुर्ण पणे बंद आहे. तरी वाहनधारकांना याची नोंद घ्यावी.
सौ रसिका अमर पाटील जिल्हा परिषद सदस्य , रस्ता दुरुस्तीचे काम सातत्याने आणि चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. आठवड्याभरात पावसाळ्यापूर्वी हा मार्ग खुला होणार आहे.
सुभाष पाटील हनमंतवाडी सामाजिक कार्यकर्ते,
चिखली शिंगणापूर रस्त्याचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे, चार दिवसात उर्वरित काम करून रस्ता वाहतुकीस पावसाळ्यापूर्वी सुरू होणार आहे.