चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर भाजपा तर्फे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन प्रदान व धान्य वाटप
करवीर :
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
करवीर तालुका भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सेवा दिन म्हणून साजरा करणेत येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून करवीर तालुक्यातील सोनाळी फाट्यावरील नंदीवाले वस्तीमध्ये लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले तसेच कुरुकली येथील कोविड केअर सेंटर वर ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन प्रदान असे कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील, भाजपा सहकार सेल जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील – कुरूकलीकर, भोगावती सह. कारखाना संचालक दत्तात्रय मेडसिंगे, दिव्यांग आघाडी सेल जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार, सरचिटणीस कृष्णात भोसले,कोषाध्यक्ष बी.वाय.लांबोरे, महिला आघाडी अध्यक्षा सौ सुशीला पाटील, PMJY चे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय वरपे, सागर भोगम, कामगार आघाडी अध्यक्ष जितेंद्र पाटील,तालुका चिटणीस दिलीप उर्फ रामचंद्र देशमुख, सोशल मीडिया अध्यक्ष प्रल्हाद पाटील,युवा मोर्चा जिल्हा सदस्य निलेश खोपकर,अरुण पोवार, जयसिंग कांबळे,बेले सरपंच सौ नाजुका पाटील, कुरुकली सरपंच रोहित पाटील, कुरुकली ग्रामसेवक एस.वाय.पाटील, डॉ.यशवंत पाटील, मोहन पाटील,तुकाराम निकम, सोनाळीचे पोलीस पाटील, अमृत सुतार, अभिजीत पाटील व ग्रामस्थ यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक दयानंद कांबळे यांनी केले.