‘ गोकुळ ‘मध्ये अमृत कलश पूजन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज उर्फ पाटील यांच्या शुभहस्ते
कोल्हापूरः
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.,कोल्हापूर (गोकुळ) संघाच्या गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव याठिकाणी राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या शुभहस्ते अमृत कलश पूजनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर, चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी), खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, जि.प. सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर व संघाचे संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.