गगनबावडा मार्गावर वाकरे येथील पेट्रोल पंपाजवळ आ. पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
करवीर :
मोदींनी जनतेला आणि देशाला महागाईच्या खाईत लोटले,असे मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
क्रुडऑईलचे दर तीस रुपये प्रति बँरेल वर आले असताना मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने जनतेचे कंबरडे मोडले आहे असा तीव्र संताप व्यक्त करून महामारीच्या काळात सरकारने जनतेला दिलासा देण्या ऐवजी महागाईच्या खाईत लोटले आहे.असे आरोप करवीरचे आ. पी. एन. पाटील यांनी केले.
आज अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे ता. करवीर येथील पेट्रोल पंपाजवळ आ. पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, गोकूळचे संचालक बाळासाहेब खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. पी.एन. पाटील म्हणाले मोदी पंतप्रधान झाल्यापासून पेट्रोल डिझेल दरवाढीचा कहर झाला.काँग्रेसच्या काळात क्रुड आँईल प्रतिबँरेल १०५ रुपये असताना सर्वसामान्य जनतेला पेट्रोल ५० ते ६० रूपये दराने दिले, पण आज क्रुड आँईल चे दर ३० रुपये प्रति बँरेल दर असताना पेट्रोल १०० रुपये तर डिझेल ९३ रूपये लिटर झाले आहे.घरगुती गँसचे दर आज १ हजार झाला आहे. काँग्रेसच्या काळात ते ३०० ते ४०० रूपये होते. यामुळे देशातील शेतकरी,सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत लोटली आहे.
यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले सुरवातीला नोटबंदीने जनतेचे हाल हाल केले,नंतर काळा पैसा देशात परत आणणार होते,
तो पैसा काय आलाच नाही,नुसत्या थापाच त्यांनी मारल्या,आता महामारी,महागाई,बेरोजगारी,सर्व सामान्यांच्या नरडीचा घोट मोदींनी घेतला आहे.म्हणे, मन की बात, अशा पोकळ व खोटी आश्वासने जनतेला देत जनतेची दिशाभूल मोदींनी केली आहे.
गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले धर्माच्या नावाखाली युवा वर्गाला भडकवण्याचे काम करून मोदींनी सत्ता घेतली पण महागाईचा भस्मासूर निर्माण केला आहे. असे सांगितले.
यावेळी अमर पाटील,पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, उत्तम पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील,जि.प. परिषद सुभाष सातपूते , यशवंत बॅक सदस्य सुभाष पाटील ,रणजीत पाटील ,संभाजी पाटील , नारायण खाडे , सरदार पाटील,बबलू पाटील कार्यकर्ते
उपस्थित होते .