पंतप्रधानांची महत्त्वपूर्ण घोषणा : आता १८ वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस
नवी दिल्ली :
देशातील नागरिक सर्व प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कोरोना महामारीशी झुंज देत आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित करीत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशात यापुढे सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच राहील. २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे.
पंतप्रधान म्हणाले, १ मे पासून १८ वर्षांवरील लोकांना लस देण्याचे राज्यांवर २५ टक्के सोपवले होते. हे काम करत असताना किती अडचणी येतात .
नागरिकांना त्रास होऊ नये. त्यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राकडे घेण्यात आली आहे. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्या निमित्ताने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पुढील कार्य पूर्ण करायचे आहे. तसंच, ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल, त्यांना खासगी रुग्णालयामध्ये लस घ्यायची असेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात. लसीची जी किंमत आहे, त्यावर सर्व्हिस चार्जच खासगी हॉस्पिटल घेऊ शकतात, असे मोदींनी स्पष्ट केले .
भारताने वर्षभरात एक नव्हे दोन लशी तयार केल्या. आम्ही कोणत्याही देशांपेक्षा कमी नाही, हे दाखवून दिले आहे. 23 कोटी नागरिकांना लस देण्यात आली. आपल्या शास्त्रज्ञांनी लस निर्माण करण्याची क्षमता होती, याबद्दल पूर्ण विश्वास होता. सात वेगवेगळ्या कंपन्या काम लस बनविण्याचे काम करीत आहेत, असेही मोदींनी सांगितलं.