शिरोली दुमाला येथील घटना : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १० बकऱ्यांचा मृत्यू
करवीर :
शिरोली दुमाला (ता.करवीर) येथील एकनाथ पाटील यांच्या आंब्याच्या बागेतील शेतात बकऱ्यांचा तळ बसविण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री बकऱ्यांच्या तळावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला. हल्ल्यात १० बकरी मृत्युमुखी पडली आहेत.
रघुनाथ विठ्ठल गावडे यांचा बकऱ्यांचा
तळ बसला होता. यात त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे,
वनविभागाचे अधिकारी डॉ .ए.एस. इंगळे, डॉ. ए.एस.माने, वनरक्षक विजय पाटील, बाळासाहेब कोळेकर, बाबासाहेब धनगर आदी पाहणी दरम्यान उपस्थित होते.