गोकुळ संचालकांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट


मुंबई :

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) व नूतन संचालक मंडळाने आज गुरुवार (दि.३) मुख्‍यमंञी उद्धवजी ठाकरे, उपमुख्‍यमंञी अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्‍थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री नाम. हसन मुश्रीफसो, कोल्‍हापूर पालकमंत्री नाम.सतेज पाटील व आरोग्‍य राज्‍यमंत्री नाम. राजेंद्रजी पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

      यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वासराव पाटील (आ‍बाजी) व संचालक  मंडळाने मुंबई येथील प्रतिदिनी विक्री १० लाख लिटर्स इतकी असून १०लाख लिटर्स पॅकिंगसाठी किमान १० एकर जागा शासनांकडून उपलब्‍ध झालेस जिल्‍ह्यातील लाखो दूध उत्‍पादकांना दिलास मिळणार आहे. तसेच राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आर.के.यु.वाय) चार चिलिंग सेंटरचे आधुनिकरण व विस्‍तारीकरण व दुग्‍ध व्‍यवसायासमोर असणा-या अडीअडचणीबाबत व संघाच्‍या प्रलंबित असणा-या विविध प्रस्‍तावांना मंजुरी मिळणेबाबत संघाच्‍या मागण्याचे निवेदन मुख्‍यमंत्र्यांकडे दिले.

यावेळी सदरचे सर्व प्रस्‍ताव मंजुर करण्‍याचे आश्‍वासन दिले. तसेच जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले असतानासुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून आपण वेगळा ठसा उमटवला व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना व ग्राहकांना दिलासा दिला आहे. अशा वेळी दुध व्यवसाय हाच एक शेतकऱ्यासाठी आशेचा किरण बनला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे व्हावे, असे मार्गदर्शन करून व सर्व नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्‍यमंञी यांच्या भेटीदरम्यान त्यांनीही गोकुळच्या उत्कृष्ट कामकाजाबाबत गौरवोद्गार काढले.

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्‍य राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, अजित नरके,नविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, रणजितसिंह पाटील, एस.आर. पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, श्रीमती अंजना रेडेकर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!