करवीर तालुका भाजपातर्फे विविध कार्यक्रम
करवीर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाच्या केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर आजचा दिवस सेवा कार्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. या अनुषंगाने करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव दिनकर पाटील – हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कोरोना महामारीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे इतर कर्मचारी, पोलीस यांच्यासह या कठीण काळात आपली सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला जात आहे. त्याच बरोबर कोरोना रुग्णांना कोविड केअर सेंटर, अलगीकरण केंद्र उभारणी तसेच अशा केंद्रांवर मेडिकल किट, उपकरणे, मास्क ,फेस शील्ड अशी साधने पुरविणे तसेच कोविड सेंटर व अलगीकरण केंद्राचे ठिकाणी नाष्टा, पौष्टिक अल्पोपहार, फळे वाटप करणे असे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक गाव व वाडी वस्तीवर राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव दिनकर पाटील – हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुकली,कुडित्रे शिंगणापूर या ठिकाणी कोविड केअर सेंटरवर पौष्टीक आहार व फळे वाटप कार्यक्रम, हळदी (ता.करवीर) येथे रक्तदान शिबिर आणि अलगीकरण केंद्राचे उद्घाटन असा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच गावोगावी कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या सर्वांना भेटवस्तू व सन्मान पत्र वाटप करण्यात आले.
प्रारंभी स्वागत प्रास्ताविक व आभार दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास भाजपा सहकार सेल जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील – कुरूकलीकर, भोगावती कारखाना संचालक दत्तात्रय मेडसिंगे, दिव्यांग आघाडी सेल जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार, कृष्णात भोसले, मारुती बुवा, बी.वाय.लांबोरे,अक्षय वरपे, सागर भोगम, संजय शेलार, एम आर पाटील, सचिन पाटील, नवनाथ पोवार, उत्तम गाडवे, उत्तम देसाई, जितेंद्र पाटील, महिला अध्यक्षा सुशीला पाटील, शिवाजी देसाई, रामचंद्र देशमुख, आनंदराव चौगले, राजाराम चौगले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.