कोल्हापूर :
इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी योग्य करिअर निवड करता यावी या उद्देशाने www.mahacareerprotel.com हे पोर्टल सुरु करण्यात आले असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील 799 माध्यमिक शाळांमधील 1 लाख 79 हजार 159 विद्यार्थ्यांना या पोर्टल चा लाभ घेता येणार आहे.
या पोर्टल मध्ये 555 पेक्षा अधिक करिअरच्या विविध वाटा, 21 हजार पेक्षा अधिक देश-विदेशातील कॉलेजेस ची पूर्ण माहिती, 1 हजार 150 पेक्षा अधिक प्रवेश परीक्षांची माहिती व फॉर्म भरण्याची सुविधा, 1 हजार 200 पेक्षा अधिक विविध शिष्यवृत्त्यांची माहिती प्राप्त करण्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे. सध्या या पोर्टलला जिल्हा परिषद, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 100 टक्के अनुदानित शाळेतील इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी लॉगिन करू शकतात. या पोर्टल मधून विद्यार्थ्यांना बारावीनंतर कोणत्या करिअर साठी कोणती संस्था किंवा विद्यापीठ सर्वोत्कृष्ट असेल यासह नवनवीन करिअरच्या संधी, कोर्सचा कालावधी,फी, प्रवेश परीक्षा, परीक्षा फॉर्म प्रारंभ व शेवटची तारीख इ. सर्व अपडेट माहिती मिळणार आहे. कोविंड 19चा इम्पॅक्ट कोणकोणत्या करिअर वर झाला आहे किंवा नाही याचीही माहिती यामधून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या पोर्टल मध्ये एकूण 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. करिअर, कॉलेजेस / महाविद्यालये, स्कॉलरशिप आणि प्रवेश परीक्षा.
करियर- या ऑप्शन मध्ये दोन प्रकार दिलेले आहेत एक प्रोफेशनल करिअर म्हणजेच डिग्री ओरिएंटेड कोर्सेस आणि दोन वोकेशनल करिअर म्हणजेच शॉर्ट डिप्लोमा कोर्सेस
कॉलेज किंवा महाविद्यालये- या ऑप्शन मध्ये कॉलेजमध्ये असणारे विविध करिअरचे पर्याय ,उपलब्ध कोर्सेस, रँकिंग, पात्रता ,in-tech कॅपॅसिटी ,खर्च किती येणार ,ॲडमिशन प्रोसेस कशी आहे.
स्कॉलरशिप- या ऑप्शन मध्ये स्कूल लेवल कॉम्पिटिशन, इंटरनॅशनल स्कॉलरशिप ,करिअर वाईज् स्कॉलरशिप ,सब्जेक्ट वाईज् कॉम्पिटिशन इ. वेगवेगळ्या स्कॉलरशिपची परिपूर्ण माहिती दिलेली आहे.
प्रवेश परीक्षा- या ऑप्शन मध्ये इयत्ता बारावी नंतर प्रवेश परीक्षेसाठी ॲप्लिकेशन फी ,प्रवेश प्रक्रिया, लिंक, सहभागी कॉलेजेस, परीक्षा केंद्रे ,परीक्षेचे स्वरूप ,उपलब्ध जागा आणि पात्रता या बाबींचा समावेश आहे ही सर्व माहिती परिपूर्ण व संपूर्णपणे अपडेट असणार आहे.
महाकरियर पोर्टल आता अँड्रॉइड ॲप च्या स्वरूपातही उपलब्ध करून दिले आहे. कोरोना महामारी च्या लॉकडाउनच्या काळामध्ये विशेष करून इयत्ता दहावी- बारावीचे विद्यार्थी पुढील शिक्षणाबाबत खूपच संभ्रमावस्थेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हे महाकरियर पोर्टल एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे.
उद्याच्या भागात……
विद्यार्थ्यांसाठी : महाकरियर पोर्टल :
जिल्ह्यासाठी 25 समुपदेशकांची नियुक्ती त्यांचे नाव व फोन नंबर …