घानवडे येथील अलगीकरण कक्षातील रुग्णांशी राजेंद्र सूर्यवंशी यांनी साधला संवाद : कोरोनाचा आढावा घेऊन युवकांनी सुरक्षितेसाठी पुढाकार घेण्याचे केले आवाहन
करवीर :
करवीर तालुक्यातील घानवडे गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या , ग्राम दक्षता समितीच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी शाळेतील अलगीकरण कक्षातील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी गावातील एकूण कोरोना रुग्ण किती आहेत, त्यांच्यावर कोठे कोठे उपचार सुरू आहेत याची माहिती पदाधिकारी यांचेकडून घेऊन गावात औषध फवारणीसाठी लागणारे साहित्य मोफत देण्याचे आश्वासन दिले. युवकांनी गावच्या सुरक्षिततेसाठी खास करून पुढाकार घ्यावा, जनजागृती करावी, दक्षता बाळगावी असे आवाहनही केले.
यावेळी सरपंच प्रकाश कांबळे, के.बी पाटील सर, नामदेव तळप, एकनाथ पाटील, विशाल पाटील, सागर सावंत, प्रमोद पाटील उपस्थित होते.