लॉकडाऊन जाहीर : बंद राहणार
बॅंका /सर्व उद्योग, व्यापार, अस्थापना, कार्यालये/इतर अस्थापना, व सेवा पुरविणारे घटक : आणि सुरू काय रहाणार वाचा …
कोल्हापूर :
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी १५ रोजी रात्री 12 ते रविवार ता. 23 रात्री १२ पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले . या लॉकडाऊन मध्ये दूध वितरण व विक्री, अत्यावश्यक सेवा, औषध दुकाने सुरू राहतील. एमआयडीसी भाजी मंडई सह इतर सर्व कार्यालय बंद राहतील अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील कोरोना साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन करावे लागेल, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय झालेल्या बैठकी मध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याकडे सर्व आमदारांनी केली. या मागणीनुसारच शनिवारपासून होणाऱ्या लॉक डाऊन चे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात असे आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान शनिवार पासून होत असलेल्या लॉकडाऊन मध्ये एमटीडीसी बंद ठेवली जाणार आहे. भाजी मंडई बंद ठेवून घरपोच भाजी विक्री करता येणार आहे. याशिवाय खासगी कार्यालये, बँक ही बंद राहातील.
बंद राहणार……
बॅंका बंद राहणार/सर्व उद्योग, व्यापार, अस्थापना, कार्यालये/इतर अस्थापना, व सेवा पुरविणारे घटक – व्यवसाय.
कोल्हापुरात येणाऱ्यांसाठीचे नियम असे
/आरटीपीसीआर चाचणी ४८ तासांच्या आतील बंधनकारक/मालवाहतूक करऱ्यांमध्ये दोन पेक्षा जादा -चालक व क्लिनर यांनाच परवानगी.
सुरू रहाणार…
दूध संकलन ,वाहतूक व वितरण व्यवस्थादूध ,भाजीपाला व गॅस घरपोच सेवा सकाली ६ ते १० व दुपारी चार ते सायंकाळी ७ (घरपोच वितरण).
/ सर्व वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने,वैद्यकीय सुविधेसाठी सर्व उत्पादने / शेतीशी निगडीत व मान्सून पूर्व कामे/पेटोल-डिझेल विक्री व वाहतूक/ कायदा व सुव्यवस्थेसाठी लागणारी सर्व शासकीय कार्यालये/एटीएम, पोस्ट कार्यालये/प्रसारमाध्यमे, र्वृत्तपत्र कार्यालय, वितरण/ सर्व प्रकारची माल वाहतूक.