रासायनिक खताचे दर गगनाला भिडले : डीएपीची बॅग आता 1900 रुपये
कोल्हापूर :
एक एप्रिल पासून रासायनिक संयुक्त , खताचे दर वाढणार होते, दरवाढीविरोधात तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर केंद्र सरकारने दरवाढ मागे घेतली होती.मात्र आता थेट सूचना न देता वाढलेल्या दराचे खत सर्वत्र विक्रीस आले आहे. रासायनिक विविध खताचा दर 700 रुपये पर्यंत वाढला आहे.जिल्ह्यात खरीप, रब्बी हंगामात चार लाख टन खत लागते .खताची दर वाढ झाल्याने जिल्ह्यात सुमारे 350 कोटींचा,या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या तूंन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वत्र उसाची ,आणि पावसाळी खरिपाची कामे सुरु आहेत . ऊस पिकासाठी स्फुरद प्रमाण जास्त असल्याने यामुळे डीएपी खताला मागणी आहे.मात्र डीएपी खाताचा तुटवटा झाला होता,आता वाढलेल्या दराचे खत विक्रीसाठी आले आहे .यामुळे शेतकरी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणावर करत असून कॉम्प्लेक्स खते वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
एका महिन्यात डीएपी खताचा दर चार वेळा वाढला आहे,1330 वरून 1450 दर झाला ,पुन्हा दर वाढून 1900 रुपये झाला आहे . याबाबत एक खत विक्रते यांच्याशी संपर्क साधला असता डी.ए.पी खताच्या पोत्याला टप्याने 140 रुपयांवरून 700 रुपये पर्यंत दर वाढ झाली आहे.नुकतेच
वाढीव दराचे खत मार्केट मध्ये आले आहे . काही कंपन्यांनी वाढलेल्या दराचे खत पंधरा दिवसापूर्वी वेअर हाऊस, गोडाउन मध्ये ठेवले होते. केंद्राची परवानगी आल्यानंतर हे खत विक्रीसाठी बाहेर निघणार होते,अशी खात्रीशीर माहिती, एका विक्रेत्याने दिली .
केंद्रशासन विद्राव्य खते सोडून खत कंपन्यांना अनुदान देते, उत्पादन खर्च वाढल्याने , खताला अनुदान न वाढल्यास ही दरवाढ होणार होती . या दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या तूंन तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान खत दर वाढ झाल्याने डुप्लिकेट खतांचा सुळसुळाट वाढणार आहे.खरीप,रब्बी हंगामाचा विचार करता , चार लाख टन खत जिल्ह्यासाठी लागते .खताची दर वाढ झाल्याने सुमारे 300 कोटींचा फटका हंगामात शेतकऱ्यांना बसणार आहे. निवडणुकीत आवाज घुमला आता, दरवाढीविरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज गप्प का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या तून विचारला जात आहे.
चौकट
खताचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आता बेहिशोबी खत टाकने परवडणार नाही, यामुळे माती परीक्षण करून, गरजेनुसार खत द्यावे लागणार आणि , हिरवळीचे खत, जैविक खते ,कंपोस्ट खते, वापरून १५ ते २० टक्के संयुक्त रासायनिक खतात बचत करावी लागणार आहे.
खताचे नाव ,जुना दर, आणि वाढलेला दर,आणी झालेली वाढ अशी …
10:26:26 -जुना दर 1175-1775 वाढीव दर 600,
12:32:16 एन पी-1185-1800 – 615 रुपये वाढ
डीएपी एनपीके – जुना दर 1200 नवीन दर 1900 दरवाढ 700 रुपये,
-10:26:26-1330-1925- वाढ 595,
पोटॅश -850-1000-वाढ 250,
20:20:0:13 पी,पी -975-1400-425 रुपये वाढ,
16:16:16 – 1075-1400- वाढ 325,
ही दरवाढ तीन कंपनीच्या खताची असून अन्य कंपन्यांचे ही दर कमी जास्त प्रमाणात वाढ झाली आहे .
महादेव पाटील ,वाकरे शेतकरी, ही दरवाढ शेतकऱ्यांना न परवडणारी आहे ,केंद्र शासनाने या खताच्या दरवाढीच्या प्रमाणात उत्पादन खर्चावर आधारित शेती मालाला दर द्यावा,व उसाचा दर ही दुप्पट करावा,
राजू शेट्टी, माजी खासदार ,
लॉकडाउनच्या आडाने दरवाढ केली, केंद्राने पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायदे आणले, नंतर निती आयोगाच्या आडून उस दराचे तुकडे पाडले, आता खत दरवाढ केली. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे, दीड पट भाव देऊ म्हणून सांगून सत्तेवर आले, आता उसाचा दर कमी,आणि उत्पादन खर्च जादा आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटींहून अधिक भुर्दंड बसणार आहे.