चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता
मुंबई :
अरबी समुद्रात शुक्रवारी (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तिव्रता वाढून ते चक्रीवादळात रुपांतरीत होईल. या चक्रीवादळाचा प्रभाव रविवारी (ता. १६) महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर याचा प्रभाव जाणवेल.
या मुळे कोल्हापूर जिल्ह्यात दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई….
या चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच याचा प्रभाव मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाहायला मिळेल. या दिवसात अरबी समुद्राने रुद्र अवतार धारण केल्याचे पाहायला मिळेल असेही शुभांगी भुते यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे रविवारी (ता. 16) महाराष्ट्र व गोवा किनाऱ्यावर 40, 45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत सर्व मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सुचना दिल्या असून, समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधानतेचा इशाराही देण्यात आलेला आहे.
दरम्यान, पूर्वमध्य अरबी समुद्रात शुक्रवारी ( ता. १४) ते रविवार (ता. १६ मे ) रोजी वादळ सदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच सुमारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.