होम कॉरंनटाईन व्यक्ती गावात फिरल्यास त्या कुटुंबाला पाच हजार दंड करा : प्रांताधिकारी वैभव नावडकर : आमशी गावाला भेट
करवीर :
होम कॉरंनटाईन व्यक्ती गावात फिरल्यास त्या कुटुंबाला पाच हजार दंड करा, सर्दी खोकला असलेल्या रुग्णाची गावातच अँटीजन टेस्ट करा,
शासनाच्या नियमांचे पालन करा आणि कोरोनाची साखळी तोडा,
असे आदेश प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिले. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या आमशी गावाला भेट दिली यावेळी ते बोलत होते. सरपंच उज्वला पाटील व सदस्य उपस्थित होते.

यावेळी नावडकर यांनी रुग्णांचा आढावा घेतला,होम कॉरंनटाईन सहा व्यक्ती असून ते नागरिक गावात फिरत असतात, त्यांच्या कुटुंबाला पाच हजार रुपये दंड करा, रुग्ण सापडलेस त्यांना शाळेत विलगीकरण करावे, कोल्हापुरात ऑक्सीजन बेडची कमतरता आहे, यामुळे सर्दी खोकला तापाचा रुग्ण असेल तर गावात टेस्ट करावी व शिंगणापूर किंवा कुडित्रे येथे सेंटरमध्ये त्यांना पाठवण्यात यावे.
याठिकाणी समूह संसर्ग वाढला असून यामुळे रुग्ण वाढले आहेत. यावेळी सर्वांना काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आदेश दिले . ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला तीन दिवस ताप होता,त्याचा मृत्यू झाला. तो कर्मचारी आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणात कसा आला नाही यावरून आरोग्य यंत्रणेला चांगलेच खडसावले.
सदस्य भगवान गुरव यांनी गावात रुग्ण संख्या वाढत असून नागरिक नियमांचे पालन करत नाहीत यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा अशी मागणी केली.
ग्रामसेवक शिवाजी वाडकर म्हणाले गावात औषध फवारणी केली आहे,एक हजार कुटुंबाना सॅनिटायझर वाटप केले आहे असे सांगितले.
यावेळी सर्कल सुहास घोदे, पोलीस पाटील लता पाटील, रामनाथ पाटील ,सरदार सावंत , ग्रामसेवक शिवाजी वाडकर, आरोग्य सेवक शरद बेंडकळे, एस. ए.कोटकर,आरोग्यसेविका एस. एस. कुलकर्णी, एस. डी. सावंत, जयदीप पाटील,आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान यानंतर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी कुडित्रे सेंटरला भेट दिली. यावेळी प्राचार्य बि.आर अकीवाटे उपस्थित होते.