मान्सून : एक जूनला केरळात दाखल होणार
पुणे :
यंदा मान्सूनला प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे एक जूनला मान्सून केरळमध्ये येण्याची शक्यता आहे. १० जून पर्यंत मान्सून कोकणात, तर २० जून दरम्यान मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज असून , यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रातील वादळामुळे गेली दोन वर्षे मान्सून लांबला होता. यंदा असे काही चित्र नसून केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रात ही वेळेवर होईल असा अंदाज आहे.
देशभर मोसमी पाऊस जून ते सप्टेंबर पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मुदतीच्या सरासरी सर ९६ ते १०४ टक्के पाऊस राहील, तसेच देशात समाधानकारक पाऊस राहील असा अंदाज वर्तविला आहे.